Zulva Palna
- Song:- Zulva Palna
- Singer:- Shubhangi Kedar
Zulva Palna Song Lyric in Hindi
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा, हा इंद्र, शोभतो पुत्र जिजाऊचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
गाली तीट लावून बाळा, काजळ घाला डोळा
उंची अंगडं घालून, त्याच्या पायी घुंगरवाळा
राजस रुपडं, डोई टोपडं, पाहून चुकतो चाळा
लिंबलोण उतरा गं लौकर, दृष्ट लागल बाळा
कौसल्येचा राम जसा हा, लाल यशोदेचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
जो जो रे बाळा जो जो रे
जो जो रे बाळा जो जो रे
जाग रे बाळा जाग रे…
हो ललकारे घुमुद्यातरे , झडूद्यात चौघडे
शिवलेणीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे
गडा गडाचे चिरे हरखले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा, हा इंद्र, शोभतो पुत्र जिजाऊचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा